विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका
लहानपणी, कॉलेजमध्ये असताना, मला विज्ञानामध्ये गोडी वाटू लागली तेव्हा तत्त्वज्ञानाचे काही ग्रंथ वाचनात आले. त्यात पाश्चात्त्यांपैकी बटैंड रसेल असावा, तसेच संस्कृतातील काही ऊहापोहात्मक पुस्तके असावीत. त्या लहान वयात उमेद फार असते आणि अवाजवी आत्मविश्वास असतो. मी विज्ञानविषयक माझी पूर्वपीठिका एका ‘श्लोकरूपात” मांडायचे ठरवले. वर्णनं नियमात् पूर्वम्, अनायासा हि भावना । समविचारी च तत् तुल्यश्च पूर्वग्रहाः …